Video : मध्यप्रदेशात झालेल्या दुर्घटनेसाठी सर्वतोपरी मदतकार्य - आमदार अनिल पाटील
मुंबई - मध्यप्रदेश येथे इंदूरहून जळगाव अमळनेरला येणारी बसचा आज ( १८ जुलै ) अपघात आहे. या दुर्घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले असून यामध्ये बरेच जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या संपर्कात राहून जखमींना लवकरात लवकर औषध उपचार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमळनेरचे आमदार अनिल पाटील ( MLA Anil Patil )यांनी या संबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते यांची भेट घेऊन तातडीने मदत कार्य (help for the accident in Madhya Pradesh ) करण्याची विनंती केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST