महाराष्ट्र

maharashtra

अजित पवार

ETV Bharat / videos

Ajit Pawar : 'मी कामाचा माणूस'; पालकमंत्री पदावरुन अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला - पालकमंत्री नेमण्याबाबत अजित पवार

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 9:26 PM IST

पुणे : Ajit Pawar On Chandrakant Patil : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद (Deputy CM Ajit Pawar) अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर भाजपाचे नेते आणि पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणामध्ये मोठ्या गोष्टीसाठी पालकमंत्री पदाचा त्याग केला आहे, असं वक्तव्य केलं होतं. (Chandrakant Patil) त्यानंतर यावर प्रथमच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मी कामाचा माणूस आहे. जे काम मिळेल ते मनापासून करतो. त्यामुळेच सकाळपासून मीटिंग घेत आहे आणि पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. सहपालकमंत्री असं काही पद नसतं. मला वाद वाढवायचा नाही, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. (Ajit Pawar)

चंद्रकांत पाटलांना टोला : अजित पवार यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीला चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. आपण सरकारमध्ये आहोत. त्यामुळे वेगळा वेळ कशाला द्यायचा असं त्यांना वाटलं असेल, असं म्हणत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी शुक्रवारी कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील आणि विभागातील सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमाशी बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details