AJit Pawar On State Govt : 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान; कशाचा बोडख्याचा गतिमान?' अजित पवारांचा संताप - निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान
जालना: 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान; कशाचा बोडख्याचा गतिमान' असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. फोटो पाहून पेपरचे पान बदलावे लागतेय. शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगायला दातखिळी बसली का? असा प्रश्न करीत त्यांनी सध्या शिंदे सरकारचा एकच धंदा सुरू आहे, अशी टीकादेखील केली.
शिधा यांच्या काकाने खाल्ला का?: राज्य सरकार स्वत:चा उदोउदो करत आहे. एक किलोचा आंदन शिधा यांच्या काकाने खाल्ला का? आनंद शिध्यात शासनाने घर चालवून दाखवावे, असे आवाहनदेखील अजित पवार यांनी केले. आज जालन्यात राजेश टोपे यांच्या नवीन साखर गाळप युनिटचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकार हजारो कोटी रुपये फक्त जाहिरातींवर खर्च करत आहेत. यांचे फोटो बघितले की, पेपरचे पान बदलावे लागते, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.
हेही वाचा: Bishnoi Gang Threat : मोठी बातमी! बिश्नोई गँगकडून खंडणीसाठी ज्वेलर्स दुकान मालकाच्या मुलीचे अपहरण करण्याची धमकी