महाराष्ट्र

maharashtra

Raosaheb Danve On Ajit Pawar

ETV Bharat / videos

Raosaheb Danve On Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे मोठे विधान - महाविकास आघाडी सरकार

By

Published : Apr 22, 2023, 10:59 AM IST

जालना : बहुमत मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांच्या वक्तव्याची राज्याने दखल घेतली असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. ते आज जालन्यात आले असता पत्रकाराशी संवाद साधत होते. अजित पवार हे धाडसी नेते आहेत. अजित पवार यांना बहुमत मिळाले तर ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. अजित पवार हे धाडसी नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने दखल घेतली आहे, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह गुवाहाटीमध्ये असताना आमदारांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले नाही तर ते स्वत: त्यांच्याच पायात अडकुन पडेल. त्यानंतर भाजपने शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे दानवे म्हणाले. आता पुढे काय होते याची उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details