अमोल मिटकरी आमच्या संपर्कात, अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीची उडविली खिल्ली - आमदार अमोल मिटकरी
आमदार मिटकरींच्या विधानावर अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी आज खळबळजनक विधान केले. राष्ट्रवादीतून अनेक लोक आमच्याकडे येतात. त्यात मिटकरी सुद्धा आमच्या संपर्कात Mla Mitkari in contact with us असल्याचे, अब्दुल सत्तार बोलले आहे. सत्तार अकोल्याच्या दौऱ्यावर असतांना शासकीय विश्रामगृह येथे बोलत होते. सध्या राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून आमदार अमोल मिटकरींवर MLA Amol Mitkari अनेक आरोप होत आहेत. एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे मिटकरीला तपासावे लागणार. त्यांना डॉक्टरांकडे नेले तर त्यांच्यामध्ये काय फॉल्ट आहे ते समजेल, असा खोचक टोला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे. कृषी मंत्री सत्तार हे अकोला दौऱ्यावर असताना, त्यांनी कृषी अधिकारी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील शास्त्रज्ञ आणि कुलगुरू यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST