महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Abdul Sattar अब्दुल सत्तारांच्या गोलंदाजीवर खासदार जलील झाले क्लीन बोल्ड...

By

Published : Oct 31, 2022, 10:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

औरंगाबाद कृषीमंत्री अब्दुल सत्तार Agriculture Minister Abdul Sattar यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील MP Imtiaz Jalil क्लीन बोल्ड झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर सत्तार नेहमी मला जिंकवतील ते मला कधीही आउट करणार नाहीत, अस गमतीशीर उत्तर खासदार जलील यांनी दिले आहे. औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनच्यावतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या गोलंदाजीवर इम्तियाज जलील हे क्लीन बोल्ड झाले. यानंतर या संदर्भात जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाहीत. ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details