अग्निपथ योजनेचा हरियाणात निषेध, पानिपतमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन - agnipath Scheme protest in panipat
पानिपत: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरात विरोध होताना दिसत आहे (agnipath scheme protest in haryana). अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ तरुण रस्त्यावर उतरले आहेत. पायी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करत आहेत. पानिपतमध्येही तरुणांनी शांततेत निदर्शने करून केंद्र सरकारच्या या योजनेचा निषेध केला (agneepath yojana protest) . मिनी सचिवालय ते संविधान चौक जी.टी.रोड असा पायी मोर्चा काढून युवकांनी दंडाधिकार्यांना निवेदन दिले व सरकारकडे अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी केली. युवकांनी चलो दिल्लाची घोषणा दिल्याने प्रशासन धास्तावले आहे. तीन जिल्ह्यात कलम 144 लावण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST