SSC Result 2023 : 59 वर्षाच्या आज्जी झाल्या दहावी उत्तीर्ण; तब्बल 40 वर्षानंतर घेतले पुस्तके हातात - Age of 59 Shital Amarale
पुणे:आज दहावीचा निकाल लागला असून यंदा देखील दहावीमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत मुलांना घवघवीत यश मिळाले आहे. असे असले तरी पुण्यातील अमराळे ज्वेलर्सच्या शितल अमराळे यांनी वयाच्या 59 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण केली आहे. त्यांना दहावी मध्ये पन्नास टक्के मिळाले आहे. याबाबत शितल अमराळे म्हणाले की, शिक्षण सोडून त्यांना चाळीस वर्षे झाली आहेत. परिस्थितीनुसार तेव्हा दहावीची परीक्षा देता आली नव्हती, हे खंत त्यांच्या मनात नेहमीच होती. दहावी उत्तीर्ण करायचे स्वप्न होते म्हणून यंदा घरातल्या कुणालाच न सांगता दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरला. 40 वर्षानंतर पुस्तके हातात घेतल्यानंतर सुरुवातीला खूप अवघड वाटले, मात्र जेव्हा घरच्या मंडळींना कळाले तेव्हा सर्वांनी सपोर्ट केला. अभ्यासाला सुरुवात केली. विशेष करून चौथीत शिकणाऱ्या व नववर्षाच्या नातवाने अभ्यासात मदत केली. आज जेव्हा निकाल पाहिला तेव्हा खूपच आनंद झाला. तसेच यापुढे देखील मी शिक्षण घेणार असल्याचे शितल यांनी सांगितले.