महाराष्ट्र

maharashtra

Bike Rider Abuses Woman

ETV Bharat / videos

Bike Rider Abuses Woman : पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची धडक, दुचाकी चालकाने केली महिलेला शिवीगाळ - दुचाकी चालकाने गेली महिलेला शिवीगाळ

By

Published : May 31, 2023, 10:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : रस्त्यावरून जाताना वाहन चालकांमधे होणारे वाद नेहमीच होतात. असाच वाद नगर नाका भागात झाला. यात दुचाकीस्वार इसमाने चक्क चारचाकी वाहनात जाणाऱ्या पोलीस दाम्पत्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला. एक इसम बुलेटवरून जात असताना त्याचा ताबा सुटून तो खाली पडला. मात्र त्याचा दोष त्याने मागून येणाऱ्या कारमध्ये असलेल्या पोलीस दाम्पत्यावर लावला. त्याने तेथील संबंधित महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. बराचवेळ गोंधळ सुरू होता, वर्दित असलेल्या पोलिसांना त्याने शिवीगाळ सुरू ठेवली. तर वाहतूक खोळंबा झाल्यावर समजून सांगण्यासाठी आलेल्या काही महिलांना देखील दुचाकी चालकाने शिवीगाळ केली. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असला तरी, मात्र, ही घटना कधीची आहे याबाबत खात्रीशीर माहिती समोर आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details