Actor Ritesh Deshmukh : मालाड मस्ती फेस्टिवलमध्ये सहभागी झाला अभिनेता रितेश देशमुख व पत्नी जेनेलिया, पाहा व्हिडिओ
मुंबई - मालाड मस्ती फेस्टिवल सध्या सुरू आहे. या फेस्टिवलमध्ये अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांचे अनेक चाहते त्यांना पाहण्यासाठी मालाड परिसरात आले होते. रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसोझा 'तुझे मेरी कसम' द्वारे बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'तुझे मेरी कसम' म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 'तुझे मेरी कसम' म्हणत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. माऊली या रितेश देशमुख च्या मराठी पदार्पण चित्रपटात जिनिलिया ने आयटेम साँग केले होते. आता ते दोघं ज्या मराठी चित्रपटातून एकत्र येताहेत तो म्हणजे वेड. त्या दोघांनीही मालाड मस्ती या कार्यक्रमातून 'वेड' च्या प्रमोशनची दमदार सुरूवात केली. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख या गोड कपल ने आज 'मालाड मस्ती' ला भेट दिली आणि उपस्थित लोकांशी संवाद साधला. त्या प्रसंगी 'वेड' चे टी शर्ट दोघांनी परिधान केले होते जे लोकांना विशेष लक्षवेधी वाटत होते. रितेश देशमुख 'वेड' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करतोय. तसेच जिनिलिया देशमुख 'वेड' द्वारे मराठी चित्रपटांत अभिनय पदार्पण करतेय. रितेश अभिनेता व दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका सांभाळतोय तर जिनिलिया निर्माती आणि अभिनेत्री अशी दुहेरी भूमिका सांभाळतेय. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी 'वेड' चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर गीते अजय - अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. 'वेड' चित्रपटाची पटकथा ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत. सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे. संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. रितेश आणि जिनिलिया देशमुख सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार 'वेड' या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. मुंबई फिल्म कंपनी ने या चित्रपटाची निर्मिती केली असून 'वेड' ३० डिसेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST