Raza Murad Replies to Loudspeaker Politics : भोंग्याच्या 'राज'कारणाला अभिनेता रजा मुरादचे उर्दू शायरीतून उत्तर, म्हणाले... - Raj Thackeray
ठाणे - 'ऐ काश अपने मुल्क मे ऐसी फिजा बने, मंदिर जले तो रंज मुसलमान को भी हो, पामाल होने पाये ना मस्जिद की आबरू, ये फिक्र मंदिरों के निगेहबान को भी हो,' या उर्दू शायरीने अभिनेता रजा मुराद ( Raza Murad ) यांनी सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या राजकारणाला उत्तर ( Loudspeaker Politics ) दिले. कल्याण पूर्वेत सूचक नाका आरपीआयचे जिल्हा कार्यध्यक्ष भारत सोनवणे यांच्या तर्फे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये ( Iftar Party ) आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अभिनेता रजा मुराद यांनी मत व्यक्त केले. सध्या सुरू असलेल्या भोंग्यावरील राजकारणाबाबत बोलताना रजा मुराद यांनी सध्या जे राजकारण सुरू आहे. त्याला आजच्या सारखे कार्यक्रमच उत्तर आहेत. यावेळी मुस्लिमांसह इतर समाजातील बांधवानी सहभाग घेतला, असे कार्यक्रम सुरू राहिले पाहिजेत. आम्ही दिवाळी, होळी साजरी करू, तुम्ही इफ्तारीच आयोजन करा, हे राष्ट्रीय ऐक्य आहे, असे मत व्यक्त करून भोंग्यावरील राजकारणाला आपल्या शायरीच्या अंदाजात उत्तर दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST