अबू आझमी संगमनेर दौऱ्यावर, ग्रामस्थांचा रोष पाहून पोलिसांनी रोखलं, पाहा व्हिडिओ - अबू आझमी
Published : Nov 19, 2023, 2:16 PM IST
संगमनेर Abu Azami : समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांच्या राहुरी तालुक्यातील गुहा गावातील दौऱ्याला ग्रामस्थांनी विरोध केलाय. तुम्ही जर मंदीराला दर्गा म्हणत Dसाल तर तुम्हाला गावात प्रवेश नाही, असं फलक घेऊन गुहा गावातील ग्रामस्थांनी नगर मनमाड रोड जवळच असलेल्या गावाच्या वेशीवरच त्यांना थांबवलं आहे. गुहा गावात दोन गटामध्ये धार्मिक स्थळावरून वाद आहे. यावरुन वफ्फ बोर्डात सुनावणीही सुरू आहे. जागेच्या आणि धार्मिक स्थळाच्या मालकी वरुन दोन गटात अनेकदा वाद झाले आहे. काही दिवसापूर्वी दोन गटात वाद झाले होते. त्यात पुजाऱ्यांना माराहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राहुरी पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हेही दाखल करण्यात आलं होतं. त्यातच आज गुहातील धार्मिक स्थळाला अबू आझमी भेट देणार असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सकाळपासुनच गाव बंद ठेवत अबु आझमी यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले आहेत. गृहातील ग्रामस्थांच्या विरोध पाहता अबू आजमी यांनी पोलिसांनी संगमनेर येथेच रोखले आहे. संगमनेर येथून थेट अबू आजमी श्रीरामपुरकडे रवाना होणार असल्याचं बोलले जात आहे.