Abdul Sattar मी काही बोललो तर पुन्हा अडकवाल, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया - अब्दुल सत्तार
औरंगाबाद राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे supriya sule यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath shinde यांनी अब्दुल सत्तार abdul sattar यांचे कान टोचले आहेत. त्यानंतर सत्तार हे आता चांगलेच अँलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचे राजकीय भाष्य करण्यास नकार दिला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात मला राजकीय प्रश्न विचारू नका, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. सत्तार यांनी संजय राऊत यांच्या जामीनाबाबत मात्र भाष्य केलं. राऊत यांना माझ्या शुभेच्छा, पण ते वाघ आहेत की नाही, हे मला माहित नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असं सांगत, मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल असे म्हणाले. abdul sattar on sanjay raut
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST