Abdul Sattar on Sanjay Raut : 'त्या' महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवलं; अब्दुल सत्तारांची जीभ घसरली - अब्दुल सत्तार प्रतिक्रिया
पुणे :खासदार संजय राऊत यांनी आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात शिवसेना शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. यावर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, तो कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेवर पाठवले आहे. कुत्र्यासारखी अवस्था त्यांची झाली असून, रोज सकाळी उठल्यावर आमच्यावर ते भोकत आहेत. त्यांच्या पेक्षाही वाईट आम्हाला बोलता येते. पण आम्ही बोलणार नाही. ते जर आम्हाला कुत्रा म्हणत असतील तर, त्या महाकुत्र्याला राज्यसभेवर आम्हीच पाठवले आहे. हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या मतावर निवडून यावे, अशी टीका यावेळी सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना कृषी आयुक्तांबरोबर बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
सामना वाचून काहीही फायदा नाही: तसेच ते पुढे म्हणाले की, मी सामना वाचत नाही. सामना मध्ये वाचण्यासारखे काहीही नसते. सामना वाचून काहीही फायदा नाही. 5 ते 10 रुपये फुकट खर्च करायचे. तसेच जो दुसऱ्याला कुत्रा म्हणतो पाहिले तोच कुत्रा असतो. याच जर बिस्मिला करायच असत तर तेव्हाच केले असत. अस देखील यावेळी सत्तार म्हणाले. तसेच राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वी अवकाळी पाऊस हा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या तालुक्यात पडायचा आणि तेव्हा त्या ठिकाणी पाहणी करून मदत केली जात होती. पण आत्ता सातत्याने आपण पाहतोय की, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही अवकाळी पाऊस होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आत्ता पर्यंत झालेल्या अवकाळी पाऊसात 82 टक्के पंचनामे हे झाले आहे. पण दररोज पाऊस पडत असून आकडेवारी ही वाढत आहे. तसेच काही नवीन ठिकाणी देखील पाऊस पडत आहे. पुढील 4 दिवस हवामान खात्याने पाऊसाची शक्यता वर्तविली असून जो पर्यंत पाऊस थांबत नाही. तो पर्यंत पंचनामे हे थांबले असून शेतकऱ्यांना सर्वस्वी मदत केली जाणार आहे असही ते म्हणाले.