Video : महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राग येत नाही का; आदित्य ठाकरेंचा सवाल - आदित्य ठाकरे नागपूर
राज्यपाल महापुरुषांच्या बद्दल जे म्हणाले आहेत, त्यामुळे सर्वांच्या मनात राग आणि चीड निर्माण झाली आहे. महापुरुषांचा अपमान होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना Chief Minister and Deputy Chief Minister राग का येत नाही, असा प्रश्न माजी मंत्री आदित्य ठाकरे Aaditya Thackeray questioned यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा सरकारने राज्यपालांना पदमुक्त केले पाहिजे होते, त्यांना परत पाठवले पाहिजे होते. आम्ही जेव्हा राज्यपालांच्याबद्दल बोलायला लागलो तेव्हा आमच्या विरोधात घोषणा दिल्या आणि आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी राष्ट्रपिता संदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST