बेंगळुरूमध्ये एका महिलेला टँकर चालकाने धडक दिली; व्हिडिओ व्हायरल - Tanker Driver Runs over woman in Bengaluru
बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू शहरात मंगळवारी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. लगेरे बसस्थानकाजवळील पब्लिक स्कूलसमोर टँकरने स्कूटरवरून जात असलेल्या महिलेला धडक दिल्याने हा अपघात झाला. आशा असे या महिलेचे नाव आहे. आशा बंगळुरूच्या किम्स हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. त्या बसस्थानकातून लगेरे येथील घराकडे जात असताना टँकर चालकाने तिला धडक दिली. चालक मोबाईल वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर चालकाने टँकर सोडून पळ काढला. याप्रकरणी राजाजी नगर वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST