Video : नाच रे मोरा नाचं! मुक्तछंदाने नाचताना मोराचा व्हिडिओ आला समोर - हा व्हिडिओ कोरबा
कोरबा (छत्तीसगड) : कोळसा आणि ऊर्जा प्रकल्पांसोबतच कोरबा जिल्हा जैवविविधतेसाठीही प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात विषारी साप असो किंवा आकर्षक नाचणारा मोर असो, कोरबाच्या जंगलात तुम्हाला त्यांच्याशी निगडित दृश्ये पाहायला मिळतील. आज सोमवारी अशाच एका मोराच्या नाचण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आल्हाददायक वातावरणात मोर नाचताना दिसत. कोरबा वनविभागाच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ कोरबा येथील वनांचल परिसरातील लेमरू येथील आहे. येथे एक आकर्षक मोर गावात राहतो, हा मोर सर्व गावकऱ्यांना चांगलाच माहित आहे. हा मोर गावकऱ्यांमध्ये पूर्णपणे सर्वांना परिचीत आहे. गावकरीही त्यांना आपल्यातील सदस्य मानतात. गावातील गल्ल्यांमध्ये मोर मुक्तपणे फिरतो, गावकरीही त्याला कोणताही त्रास देत नाहीत. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे.