Traditional Kutrotsav पळशी सुपो येथील 400 वर्षांची अनोखी परंपरा; पारंपारिक कुत्रोत्सवात भाविकांची मांदियाळी - मानवरूपी कुत्रे प्रसादाची लूट
Traditional Kutrotsav जळगाव जामोद तालुक्यातील तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे दांडी पौर्णिमेनिमित्त श्री सुपो महाराज यांचा पारंपरिक कुत्रोत्सव पार पड़ला. या कार्यक्रमात भाविकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेऊन महाप्रसादाचा आस्वाद सुद्धा घेतला आहे. या कुत्रोत्सवाला 400 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे सुपो महाराजांचा दांडी पौर्णिमा ला कुत्रोत्सव साजरा झाला. या कुत्रोत्सवात १८ ते ३५ वयोगटातील तरुण श्रींच्या समोर डफड्यांच्या तालावर नाचतात. मंदिरासमोर प्रसाद ठेवण्यात येतो, हा महाप्रसाद मानव रूपी भाविक लूटतात. मात्र आरती होइपर्यंत प्रसादाची लूट न होऊ देण्यासाठी मंदिराचे स्वयनसेवक प्रयत्न करतात. तर मानवरूपी कुत्रे प्रसादाची लूट करण्यासाठी आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे दांडी पौर्णिमेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव असा कुत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी साजरा करण्यात येतो.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST