कौतुकास्पद..! आईच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगाही झाला सैन्य अधिकारी; दोघांचेही एकाच अकादमीतून प्रशिक्षण - Smita Chaturvedi son army
तामिळनाडू - आपला मुलगा मोठा व्हावा, कर्तुत्ववान व्हावा, चांगल्या नोकरीवर लागावा, हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. मुलाचे यश पाहणे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. असेच स्वप्न लष्करातील निवृत्त मेजर स्मिता चतुर्वेदी यांच्या मुलाने पूर्ण केले आहे. स्मिता या 1995 साली ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई यथेून लष्करात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या मुलाने देखील याच अकादमीतून जिद्दीने शिक्षण पूर्ण करून लष्करात दाखल झाला आहे. ट्रेनिंग अकादमी पासिंग आऊट परेडमध्ये आपल्या मुलाला पाहून स्मिता यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपल्या प्रमाणे आपला मुलगा देखील देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यात जातोय, हे दृश्य पाहून त्या सुखावल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST
TAGGED:
Smita Chaturvedi son army