महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Huge python rescued by crane: झाडावर लटकला होता महाकाय अजगर, क्रेनच्या मदतीने केली सुटका

By

Published : Aug 2, 2022, 1:45 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

रुद्रपूर: सिडकुल येथील कारखान्यातील झाडावर अजगर दिसल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली (Rudrapur Forest Department). घाईगडबडीत कारखान्याच्या व्यवस्थापकाने याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अजगराची सुटका करून जंगलात सोडले. अजगराने एखाद्या जनावराची शिकार करण्याची तयारी केली होती असा अंदाज वर्तवला जात आहे. पंतनगर सिडकुल येथील कारखान्याच्या आवारातील झाडावर अजगर आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाने अजगराची सुटका करून जंगलात सुखरूप सोडले. अजगर बघून कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. कारखान्याच्या आवारातील झाडावर अजगराला कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. अजगराला नंतर पकडण्यात आले. त्यानंतर मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला (Sidcul Python Rescue). रुद्रपूरचे रेंजर बी कैदा यांनी सांगितले की, कारखान्यात अजगर आल्याची माहिती मिळाली होती. पथकाने तत्काळ पोहोचून अजगराची सुटका केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details