महाराष्ट्र

maharashtra

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू; लोणी परिसरात खळबळ

ETV Bharat / videos

बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; लोणी परिसरात खळबळ - बिबट्याचा हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 3:05 PM IST

लोणी (अहमदनगर) Leopard Attack : राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोरील गोसावी वस्तीवर राहत असलेल्या अथर्व प्रवीण लहामगे (वय 9) या बालकाचा 14 जानेवारी रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेमुळे लोणी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा घराजवळीळ शेतात खेळत होता, तेव्हा त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला. रात्र झाली तरी अथर्व घरी नं परतल्यानं त्याचा शोध घेण्यात आला असता रात्री दहा वाजता त्याचा मृतदेह सापडला. लहामगे कुटुंब ज्या परिसरामध्ये राहतात, त्या परिसरातील नागरिकांनी वन विभागाला बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, तरीही वन विभागाकडून यासंदर्भात काहीच करण्यात आलं नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती वन विभागाला मिळताच कोपरगाव वनविभाग परिक्षेत्राचे वनअधिकारी सागर केदार यांनी घटनास्थळी धाव घेत तेथील पाहणी केली.  

ABOUT THE AUTHOR

...view details