Life-Threatening Journey to School : संगमनेर येथील शाळकरी शाळेसाठी करावा लागतोय जीवघेणा प्रवास - Demanding to Chief Minister Eknath Shinde
संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पूर आला ( Mula river in Sangamner has Flooded ) असून शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो ( Children have to Make Life-threatening journeys ) आहे. संगमनेरच्या कोठे ब्रुद्रुक येथे मुलांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. यामुळे आता मुलांच्या शैक्षणिक नुकसानीबरोबर पालकांना मुलांच्या जीवाची काळजी लागलेली आहे. सर्व पालक विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली ( Parents increase in the height of bridge ) आहे. संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील शाळेमध्ये कोठे खुर्दे येथील लहान मुले शाळेसाठी येत असतात. या दोन्ही गावांमध्ये मुळा नदी वाहत असते. पावसाळा सुरू झाला रे झाला की, या मुळा नदीला पूर येत असतो. या दोन्ही गावांना जोडणाऱ्या तुटपुंज्या पुलावरून विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत असतात. संगमनेर तालुक्यातील आमदार, खासदार, माजी मंत्री यांना ही धोकेदायक परिस्थिती का दिसत नाही, असा सवाल पालकांनी विचारला आहे. संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला दरवर्षी पूर येतो आणि शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला चांगला पूल बांधून द्यावा, अशी मागणी विद्यार्थी करीत आहे. ( Demanding to Chief Minister Eknath Shinde )
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST