Thane Crime: सवलतीच्या दरात औषध विक्रीच्या वादातून मेडिकल चालकांमध्ये राडा, घटना सीसीटीव्हीत कैद - पोलिसांनी तपास सुरू केला
Thane Crime ठाणे आपल्या मेडिकलमध्ये ग्राहक येत नसल्याचे पाहून मेडिकल चालक दोघा भावांनी संगनमत करून सवलतीच्या दरात औषध विक्री करणाऱ्या शेजारच्या मेडिकल चालकाला मेडिकलमध्ये घुसून मारहाण करत राडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण- पडघा मार्गवरील बापगावातील मल्हारनगरमध्ये घडली आहे. राड्याची घटना सीसीटीव्हीत कैद असून पडघा पोलीस ठाण्यात राडेबाज मेडिकल चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार लालीराम चौधरी यांचे कल्याण - पडघा मार्गवरील बापगावातील मल्हारनगरमध्ये मेडिकल स्टोअर्स आहे. तर त्यांच्या शेजारी योगेश आणि विठ्ठल चकोर या दोघा भावांचे मेडिकल स्टोअर्स असून चौधरी हे गेल्या काही दिवसापासून सवलतीच्या दरात ग्राहकांना स्वतः दरात तसेच उधारीत औषध विक्री करीत आहे. त्यामुळे चकोर यांच्या मेडिकल स्टोअर्सकडे औषधे खरेदीसाठी ग्राहक येत नव्हेत. यावरून अनेकवेळा वादात झाले होते. त्यातच चकोर बंधूनी २७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चौधरी यांच्या मेडिकल स्टोअर्सवर येऊन शिवीगाळ करत गोंधळ घालत चौधरींना मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात एक गोंधळ उडाला होता. त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी मारहाण करणाऱ्या चकोर बंधूना शांत केले. दरम्यान, याप्रकरणी मेडिकल चालक लालीराम चौधरी यांनी योगेश आणि विठ्ठल चकोर या दोघा भावांविरोधात पडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST