महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sandeeep Patil शिवसंग्रामचे 90 टक्के नेते बाळासाहेबांच्या शिवसेनेत- संदीप पाटील - शिवसंग्रामचे 90 टक्के नेते

By

Published : Jan 4, 2023, 4:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

Sandeeep Patil शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे Shiv Sangram leader Vinayakrao Mete यांच्या निधनानंतर या पक्षामध्ये खंबीर नेतृत्व नव्हते. त्यामुळे या पक्षातील जवळपास 90 टक्के पदाधिकारी व कार्यकर्ते हे बाळासाहेबांची शिवसेना तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश करून काम करत असल्याची माहिती शिवसंग्रामचे माजी प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील Sandeep Patil यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, शिवसंग्राममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असताना विनायक मेटे यांचे निधन झाले आहे. साहेबांच्या पश्चात सर्व शिवसंग्राम पक्षातील नेत्यांनी एक संघ राहण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, राज्यस्तरावरील खंबीर नेतृत्व आवश्यक होते. संघटनेकडे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे आम्ही विनायक मेटे यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, या मागण्या घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो होतो. त्यांची कार्य करण्याची तळमळ पाहून आणि मराठा नेता जो न्याय देऊ शकतो हे पाहून शिवसंग्राममधील जवळपास 90 टक्के पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या शिवसेनेत काम करायचं. इथूनच या पक्षप्रवेशाला अकोल्यातूनच सुरुवात झाली. नाशिक व इतर जिल्ह्यातील एक एक नेते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत, अशी माहिती शिवसंग्राम सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details