महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video 80 वर्षीय महिलेने भीक मागून कमावलेले 1 लाख रुपये केले मंदिरात दान - 80 वर्षीय महिलेने भीक मागून कमावलेले 1 लाख

By

Published : Oct 19, 2022, 6:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

कर्नाटक : मंगळुरूमधील ( Mangaluru City in Karnataka ) एका मंदिरात एका वृद्ध महिलेने भिकेच्या पैशातून एक लाख रुपये दान करून आदर्श घालून दिला आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील अश्वथामा या 80 वर्षीय महिलेने हे अनुकरणीय काम केले आहे. अश्वथामाने आतापर्यंत विविध मंदिरांना सुमारे 9 लाख रुपये दान केले आहेत.सोमवारी, ती मंगळुरूच्या बाहेरील मुल्की येथील बाप्पानाडू श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरात पोहोचली आणि मंदिराच्या ( Shri Durgaparameshwari Temple ) अन्नदानासाठी 1 लाख रुपये दान ( 80 year old Woman Donates Rs 1 lakh ) केले. देणगी स्वीकारल्यानंतर मंदिराचे पुजारी नरसिंह भट यांनी अश्वत्थामाला प्रसाद दिला. मंदिराच्या वतीने प्रशासकीय मुक्तेसर मनोहर शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी प्रसाद भट्ट, लेखापाल शिवशंकर वर्मा, कार्तिक कोट्यान आदी उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details