महाराष्ट्र

maharashtra

बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

ETV Bharat / videos

Rescue Operation : बोअरवेलमध्ये पडलेल्या ४ वर्षीय मुलाला वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन, पाहा व्हिडिओ... - 4 year old boy who fell into borewell

By

Published : Aug 10, 2023, 12:11 PM IST

परभणी : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय परभणी जिल्ह्यातील मानवत येथे आला आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षीय गोलूला सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. परभणीच्या मानवत तालुक्यातील उक्कलगाव शिवारातील एका शेतात असलेल्या बोअरवेलमध्ये ४ वर्षीय गोलू उर्फ सोहम सुरेश पिंपळे हा बालक पडला होता. सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. गोलू त्याच्या आजीबरोबर शेतात गेला होता. आजी काम करत असताना तो उघड्या असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. गोलू बोअरवेलमध्ये पडल्याचे समजताच त्वरित यंत्रणा जेसीबी घेऊन त्या ठिकाणी पोहोचली. त्यांनी बचाव कार्य सुरू केले होते. बोअरवेलमध्ये कॅमेरा सोडून गोलू किती खोलीवर आहे याचा अंदाज घेण्यात आला. तो बोअरवेलमध्ये २० फुट आत होता. तेथील यंत्रणा त्याच्याशी संवाद साधत खोदकाम करीत होती. गोलू बाहेर आल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी ग्रामस्थांनी यंत्रणेचे आभार मानले. ही घटना बुधवारी घडली. 

ABOUT THE AUTHOR

...view details