महाराष्ट्र

maharashtra

कुस्ती स्पर्धा

ETV Bharat / videos

मातीवरच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचं पूजन; उद्या स्पर्धांचे औपचारिक उद्‌घाटन - Maharashtra Kesari Wrestling Tournament

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 9:03 PM IST

धाराशिव Maharashtra Kesari Wrestling Tournament: 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे पूजन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. (Puja of wrestling tournament area) 

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन :महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला धाराशिवमध्ये प्रारंभ करण्यात आलाय. जिल्हाधिकारी (Dharashiv Collector) डॉ. सचिन ओम्बासे (Dr Sachin Ombase) यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचं पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आलीय.

'या' मान्यवरांची उपस्थिती लाभणार :17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. पुढील 4 दिवस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार धाराशिवकरांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 900 मल्ल सहभागी होणार आहेत. पुढील तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details