महाराष्ट्र

maharashtra

गाड्यांची तोडफोड

ETV Bharat / videos

Pune Crime News: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; दुसऱ्या दिवशी तळजाई परिसरात 30 गाड्या फोडल्या - cars vandalized in Taljai area in Pune

By

Published : Jun 20, 2023, 10:40 AM IST

पुणे :पुण्यात दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली आहे. आज 30 गाड्या फोडल्या आहेत. दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य पुणेकरांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र सध्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. सोमवारी पुणे शहरातील वारजे परिसरात सात गाड्यांची तोडफोड झालेली असताना आज तळजाई परिसरात पुन्हा एकदा दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास 30 गाड्यांची तोडफोड ही करण्यात आली आहे. तोंडावर रुमाल बांधून 6 जणांच्या टोळक्याने आज पहाटेच्या सुमारास तळजाई परिसरात वनशिव झोपडपट्टी परिसरात 30 गाड्या फोडल्या आहे. या प्रकरणी सहकार नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details