कारला अचानक लागली आग, 3 जण गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - 3 जण गंभीर जखमी
सहारनपूर: जिल्ह्यातील बेहत शहरात सोमवारी एका नॅनो कारला आग लागली (car fire in saharanpur). आगीमुळे कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. या आगीची माहिती स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक लोकांसह आग विझवली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. स्थानिक लोकांनी सांगितले की, बेहत शहरातील मोहल्ला महाजनन येथे राहणारा सुलेमान हा त्याच्या नॅनो कारमधून साहिल आणि चांद यांच्यासोबत घरी येत होता. यादरम्यान मोहल्ला माजरीजवळ येताच कारने पेट घेतला. सध्या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून 2 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे (3 people injured in car fire).
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST