महाराष्ट्र

maharashtra

परिवर्तन पायी यात्रा

ETV Bharat / videos

Transformational Walk From Buldana: वन बुलडाणा मिशनकडून बुलडाणा ते चिखली 25 किलोमीटर पर्यंत परिवर्तन पायी यात्रा.. - परिवर्तन पायी यात्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 2:56 PM IST

बुलडाणाTransformational Walk From Buldana: वन बुलडाणा मिशनचे (One Buldana Mission) संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज बुलडाणा ते चिखली अशी 25 किलोमीटरची परिवर्तन पदयात्रा काढली आहे. बुलडाण्याची माता जगदंबा आणि चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या चरणी ते नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन शक्तीपीठांना साकडे घातले आहे. बुलडाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास (All round Development of Buldana District) या एकमेव ध्येयाने वन बुलडाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. या माध्यमातून जाहीरनामा जनतेचा या कार्यक्रमांतर्गत जिल्हाभर संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. त्यामध्ये जनतेला काय अपेक्षित आहे, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे संदीप शेळके जनतेचा जाहीरनामा मांडणार आहेत. जिल्ह्याच्या विकासाबाबत जनतेतून सूचना, कल्पना ते या यात्रेत गोळा करत आहे. यासाठी त्यांचा जिल्हा दौरा सुरू आहे. बुलडाणा परिवर्तन पदयात्रा ही बुलडाणा ते चिखली अशी २५ किलोमीटरची आहे. संदीप शेळके यांच्या हस्ते जगदंबा मातेची आरती करून त्यांनी या यात्रेला सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details