Pune Crime सराईत घरफोडी करणाऱ्या बंटी बबली अटक; तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांचा तपास, फॉर्च्युनर गाडीमध्ये करायचे रेकी - 2 accused of burglary
Pune Crime पुणे पुण्यात सराईत घरफोडी करणाऱ्या बंटी बबली जोडप्याला तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून मोठ्या शिताफीने अलंकार पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे चोरी करण्यासाठी मेव्हणी साथ देत होती. आतापर्यंत त्यांनी अनेक घरफोड्या केल्या असून, कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका बंगल्यात हिऱ्यांच्या दागिण्यासोबत 98 लाखाचा ऐवज चोरी केला होता. या प्रकरणी अलंकार पोलिसानी जोडप्यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिक आरोपी राजू दुर्योधन काळमेघ वय ४५ रा. बी ८०१ एन बी पर्ल सोसायटी क्रांतीनगर वडगाव बुद्रुक सोबतसह आरोपी सोनिया श्रीराम पाटील वय ३२ वय रा. बी ८०१ एन बी पर्ल सोसायटी क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आरोपी मेव्हणीला अलंकार पोलिसानी अटक केली असून चोरीचे सोन, हिऱ्यांचे दागिने 98 लाखांचे ऐवज जप्त केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST