Video : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेऊन केली सुटका - आझाद मैदान आंदोलन
मुंबई - आझाद मैदानावर भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली. तसेच नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी भाजपाने केला. आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST