महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Buldhana Accident Captured CCTV : भरधाव एसटीने दुचाकीचालकास उडवल्याने एकाचा मृत्यू , तर एक जखमी; अपघात सीसीटीव्हीत कैद - Accident at Andhera Fata

By

Published : Feb 15, 2022, 1:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST

बुलढाणा - भरधाव बसने दुचाकीचालकास उडविल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली ( Accident in Buldhana captured on CCTV ) आहे. दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा फाट्याजवळ ( Accident at Andhera Fata ) घडली. चिखली तालुक्यातील केळवद येथील उत्तम साहेबराव गायकवाड व राजू जगन्नाथ केसरकल हे दोघे दुचाकीने जालना येथे नातेवाईकांकडे वास्तुशांतीसाठी दुचाकीने जात होते. परंतु, रस्ता ओलांडताना त्यांचे भरधाव बसकडे लक्ष नव्हते. बसकडे लक्ष न देताच ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात ( Accident while crossing the road ) असताना भरधाव बसने त्यांना जोरदार धडक ( ST blows up two-wheeler ) दिली. या धडकेत दुचाकीचालक उत्तम केसरकल हे जागीच ठार झाले. तर राजु केसरकल हे गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद वरुन अकोल्याकडे भरधाव वेगाने बस जात होती. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details