महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ola scooter caught fire in Pune : पुण्यात ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग.. पाहा व्हिडिओ - ओला इलेक्ट्रिक स्कूटर आग पुणे

By

Published : Mar 27, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

पुणे - पुण्यात आज ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला भीषण आग ( Ola scooter caught fire in Pune ) लागल्याची घटना घडली. शहरातील धानोरी परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी दिसत आहे. ती पेटत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओला कंपनीने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. कंपनीने सादर केलेल्या निवेदनात ही आग कशी लागली याचे कारण नेमके समजू शकले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आगीची घटना समजताच कंपनीने एक पथक पुण्याला पाठवले असल्याचे देखील निवेदनात सांगण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details