VIDEO : लावण्याला न्याय मिळाल्याशिवाय एबीव्हीपी शांत बसणार नाही - निधी त्रिपाठी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
नागपूर - जस्टीस फॉर लावण्या (Justice For lavanaya) या नाऱ्याला घाबरून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. पण आता तिला न्याय मिळण्यासाठी देशभरात आम्ही आवाज उठवू असा इशारा एबीव्हीपीच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी दिला. त्या नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या. चेन्नईच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नागपुरात आल्यावर निधी त्रिपाठी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जोपर्यंत लावण्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शांत बसणार नाही असा इशारा निधी त्रिपाठी यानी दिला. तामिळनाडूमध्ये महाविद्यालय धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST