कौतुकास्पद.. महिला चिकित्सकने तोडाने ऑक्सिजन देऊन बालकाला वाचवले, व्हिडिओ व्हायरल - etmadpur newborn baby oxygen by mouth
आगरा (उ.प्र) - जनपदच्या एत्मादपूर सीएचसीमध्ये एका महिला चिकित्सकने तोडाने ऑक्सिजन (माउथ टू माउथ रेस्पेरेशन) देऊन एका नवजात बालकाचे प्राण वाचवले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकांकडून महिला चिकित्सकवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जन्मानंतर बालकाला श्वास घेण्यात त्रास होत होता. त्याला ऑक्सिजन मशीनने श्वास देण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर बालकाचे प्राण वाचवण्यासाठी महिला चिकित्सकने तातडीने त्याला तोडाने ऑक्सिजन दिले. त्यानंतर बालकाचा जीव वाचवण्यात यश आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST