NCP April Fool Agitation Nandurbar : नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे 'एप्रिल फुल' आंदोलन; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी - बेरोजगारी विरोधात नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
नंदुरबार - कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ, महागाई कमी करण्यात येईल, असे विविध आश्वासने देऊन केंद्रातील भाजपा सरकारने जनतेला 'एप्रिल फुल' बनवल्याच्या आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. याच्या निषेधार्थ पंतप्रधानांच्या बॅनर जवळ केक कापून आंदोलन केले. नंदुरबार शहरातील सुभाष चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत निषेध व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST