Nana Patole on Phone Tapping : रश्मी शुक्लांविरोधात 500 कोटींचा मानहाणीचा दावा दाखल करणार - नाना पटोले - फोन टॅपिंग नाना पटोले प्रतिक्रिया
मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब पोलीस घेत आहेत. मात्र, या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहाणीच दावा दाखल करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. रश्मी शुक्ला यांनी आपला फोन देखील टॅप केल्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. तसेच या षडयंत्रामागे भाजप असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तसेच विधिमंडळाचे अधिकार वापरुन अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक महाविकास आघाडी सरकार घेईल, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST