Nagraj Manjule visited Signal School : नागराज मंजुळे सिग्नल शाळेच्या भेटीला, सामाजिक कार्य पाहून व्यक्त केला आनंद - Signal School Thane
ठाणे - ज्यांना भेटण्यासाठी अनेक निर्माते, अभिनेते आणि अभिनेत्री ताटकळतात असे नागराज मंजुळे यांनी प्रत्यक्ष येऊन ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिली. त्यांच्या भेटीने येथील मुलांचे चेहरे खुलले. फॅन्ड्री, सैराट आणि आता झुंड अशा एका पाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिग्नल शाळेतील वंचित आणि उपेक्षित मुलांसोबत वेळ घालवला. मंजुळे हे एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आले होते. तेव्हा सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक विजू माने यांच्या आग्रहाखातर त्यांनी ठाण्यातील तीन हात नाका येथे असलेल्या सिग्नल शाळेला भेट देऊन येथील मुलांशी संवाद साधला. या मुलांमध्ये वेळ घालून आपल्याला अतिशय आनंद झाला असून, सिग्नल शाळा ही एक अभिनव संकल्पना असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले व अभिनंदन केले. सिग्नल शाळेला ( Nagraj Manjule Signal School Thane Visit ) मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू आणि कोणती मदत लागल्यास आपल्याला थेट संपर्क साधावा, अशी विनंती त्यांनी सिग्नल शाळेच्या संस्थापकांना केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST