Mumabi Police : एक कोटी चरससह मुंबई पोलिसांनी दोघांना केली अटक - दिंडोशी पोलीस
मुंबई - दिंडोशी पोलिसांनी ( Mumbai Police ) सुमारे तीन किलो चरससह ( Hashish ) दोन आरोपींना अटक केली आहे. गौरव प्रसाद (वय 19 वर्षे), कृष्णकुमार पंडित (वय 26 वर्षे), असे आरोपीचे नाव असून ते मुळचे बिहारचे आहेत. दोघे गोरेगाव पूर्व येथील शिवशाही मैदानावर चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक कोटीहून अधिक किंमतीचा 3 किलोग्रॅम वजनाचे चरस मिळाले. त्यानंतर पोलिसांनी चरस जप्त करुन पोलिसांनी दोघांना अटक केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST