Mumbai Meri Jaan : ...म्हणून अल्बर्ट ससून यांनी उभारला 'काळा घोडा' पुतळा - काळा घोडा मुंबई मेरी जान
मुंबई - मुंबईत पर्यटनाला सुरुवात करतेवेळी गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, जहांगीर कला दालन आणि येते मग काळा घोडा परिसराचे नाव. ब्रिटीशांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्बर्ट ससून यांनी 1879 साली हा पुतळा बांधला होता. 26 जून 1879 साली माजी गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांनी त्याचे उद्घाटन केले. पुढे 1965 साली जिजातमाता उद्यानाच्या दर्शनी भागात हा पुतळा हलवण्यात आला. आज येथे सातव्या राजाचा पुतळा नसला तरीही घोड्याचा एक पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच काळा घोडा ही या परिसराची ओळख कायम राहिली आहे. याबद्दल 'ईटिव्ही भारत'ने काळा घोडा फेस्टिवलच्या हॉनर चेयरपर्सन ब्रिंदा मिलर यांच्याशी संवाद साधला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST