महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : भाजपाच्या काही चमच्यांमुळेच पंतप्रधानांची दोन तासाची झोप उडाली असेल - संजय राऊत - मोदी युगात चमचे

By

Published : Mar 27, 2022, 3:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

मुंबई - मोदी युगात चमच्यांची जागा अंधभक्तीने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (24 पैकी 22)तास काम करतात, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. आता म्हणे मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल. बाकी, कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलन्स्की, पुतिन, सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. जम्मु कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या भाजपाच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अफझल गुरू आणि बुरहान वानी यांना पाठिंबा देऊनही, भाजपाने जम्मू-काश्मीरमध्ये त्यांच्यासोबत सरकार बनवले होते. (Mehbooba Mufti vs Sanjay Raut) तसेच, आज मुफ्ती जे काही बोलत आहेत त्याला भाजपा जबाबदार आहे, अशी थेट प्रतिक्रिया देत आमचा पक्षाचा याला कायम विरोध असणार आहे, असेही शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details