Mobile Theft Gang Arrested In Pune : पुणे शहरात मोबाईलची चोरी करणारी टोळी जेरबंद - gang arrested in Pune
शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल फोनची चोरी करणारी आंतरराज्य टोळीला पुणे पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. (Mobile Theft Gang Arrested In Pune) बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे स्टेशन आणि शहरातील इतर वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येतात. मात्र, त्याचा तपास लागत न्हवता. यासाठी उपायुक्त सागर पाटील यांनी काही पथके तयार केली. या पथकाने परिसरात चोरी झालेल्या ठिकाणीशोध मोहीम सुरू केली. यामध्ये 50 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून येरवडा येथील विकास वाघेरे व अनिकेत कांबळे यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यानंतर यांच्यासह आणखी तीन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख रुपये किमतींचे 70 अँड्रॉइड मोबाइलसह 4 बाईक त्याब्यात घेतल्या असल्याची माहिती उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST