Shiv Jayanti 2022 : शिवाजी पार्कात मनसेची तिथीनुसार शिवजयंती, राज ठाकरेंच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर मधून होणार पुष्पवृष्टी - shivaji park shivjayanti 2022
मुंबई - आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. ( Shiv Jayanti As per Panchang ) यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेकडून मोठ्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ( MNS Celebrate Shiv Jayanti Shivaji Park Dadar ) यात महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले जाईल. शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्कवरील शिवतीर्थ परिसर मनसेमय झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या सोहळ्याला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण शिवस्मारकाला फुलांची सजावट करण्यात आली असून संपूर्ण परिसर फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला आहे. इथे रांगोळी, तुतारी, सनई-चौघडे, राजमुद्रा असलेले ध्वज मनसेच्या निशाणी असलेले फुगे अशा सर्वांचंच येथे आयोजन आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST