महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्री कारागृहात जाणार - आमदार रवी राणा - घोटाळेबाज मंत्री

By

Published : Mar 14, 2022, 1:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

अमरावती - ठाकरे सरकारमधील दोन मंत्री सध्या कारागृहात आहेत. यापैकी एकाने राजीनामा दिला आहे. सध्या मातोश्रीवर फिरणारे ठाकरे सरकारमधील अनेक घोटाळेबाज मंत्री हे देखील लवकरच कारागृहात जातील असे बडनेराचे आमदार रवी राणा ( Badnera Mla Ravi Rana ) यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे सरकार मधील घोटाळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बाहेर काढीत आहेत. पेन ड्राइव्हसारखा बॉम्ब देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी फोडल्याने त्यांच्या विरोधात द्वेषाचे राजकारण उद्धव ठाकरे सरकार करीत आहेत, असा आरोप करीत अद्याप अनिल परब ( Anil Parab ) आणि संजय राऊत ( Sanjay Raut ) हे अद्याप बाकी आहेत, असा इशारा देखील आमदार रवी राणा यांनी दिला आहे. पाहा, आमदार रवी राणा काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details