Nawab Malik Arrested : नवाब मलिकांना भेटल्यानंतर सईदा खान म्हणाल्या, भाजपाने काहीही केलं तरी.... - Nawab Malik ED arrest
मुंबई - महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक ( Nawab Malik Arrested ) केली. त्यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या बहीण डॉ. सईदा खान या ईडी कार्यालयात गेल्या होत्या. तेव्हा नवाब मलिक यांनी लढेंगे और जितेंगे असे म्हटलं आहे. त्यामुळे भाजपाने कितीही काहीही केलं, तरी आम्ही थांबणार नाही, असे डॉ. सईदा खान यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST