मंत्री जितेंद्र आव्हाडांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही, पाहा व्हिडिओ.. - OBC Camp Jitendra Awhad play drum
ठाणे - ठाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलकडून ओबीसी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित झालेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले. यावेळी पारंपरिक नृत्यात वाजणारा ढोल वाजवण्याचा मोह जितेंद्र आव्हाड यांना आवरला नाही. त्यांनी स्वागत झाल्यानंतर घोंगडे घालून ढोल वाजवला. ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी राज्यस्तरीय शिबिरात राज्यभरातील ओबीसी सेलचे कार्यकर्ते हजर होते. या कार्यक्रमाला प्राध्यापक हरी नरके आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यावेळी हरी नरके यांनी ओबीसीसाठी बाबासाहेबांचे काम सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST