VIDEO : षंढांवरून मंत्री जयंत पाटील-खासदार सुजय विखे पाटील यांच्यात जुगलबंदी - जयंत पाटील सुजय विखे पाटील टीका
रत्नागिरी/अहमदनगर - नवरा, बायको, पाहुणे अशा बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना देणाऱ्या षंढांबाबत काहीही बोलण्याची गरज नाही. कारण, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांच्यावर केली आहे. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडीचा संसार असा आहे, लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे तर काँग्रेस हे बिनबुलाए वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचे ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका सुजय विखे यांनी यांनी केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST