Viral Video : विरारमध्ये प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत तिच्या अंगावर उधळले नोटांचे बंडल.. - विरार गुजराती धार्मिक कार्यक्रम
विरार : विरारमध्ये गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात ( Virar Gujrati Religious Program ) लाखो रुपयांच्या पैशाचा पाऊस पडला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळले आहेत. पैशांचे नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला ( Video Goes Viral Of Gujrati Religious Program ) आहे. या व्हिडिओच्या प्रकारावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वयं चैतन्य शक्तीधाम गोशाळाच्या माध्यमातून विरारच्या रायपाडा येथे शनिवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजित केले होते. राजस्थान मधील प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी, लोक साहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता. शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. गाणे चालू असताना एकामागून एक जण येऊन पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. विरारसह मीरा भाईंदर ठाणे व आजूबाजूच्या गावातील गुजराती समाजातील हौशी मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST