मैदानावर स्मारक तथा अंत्यसंस्कार होऊ नये, स्वाक्षरी मोहिमेतून शिवाजी पार्क संघर्ष समितीची मागणी - स्वक्षरी मोहीम शिवाजी पार्क संघर्ष समिती
मुंबई - छत्रपती शिवाजी पार्क मैदान गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या मैदानावर अंत्यसंस्कार तसेच स्मारक बनवण्यासाठी रोज नव नवीन विधाने समोर येत असताना दादर येथील शिवाजी पार्क बचाव संघर्ष समिती तसेच, गर्जना प्रतिष्ठान यांच्याकडून आज शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. मैदान केवळ मुलांना खेळण्यासाठी राखीव असले पाहिजे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये. तसेच, स्मारक बनविण्यात येऊ नये, अशी स्थानिक दादर परिसरातील रहिवाशांच्या स्वाक्षरी मोहिमेतून राज्य सरकारला विनंती करण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST